राहुल गांधी आज मुंबईच्या दौर्‍यावर

January 15, 2016 9:35 AM0 commentsViews:

 rahul gandhi_4
15 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज आणि उद्या मुंबई दौर्‍यावर असणार आहे. आज दुपारी दोन वाजता मालाड इथं कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

त्यानंतर संध्याकाळी 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत मुंबई काँंग्रेस भवन येथे मुरली देवरा हॉलच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहणार आहे.  संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास मुंबईतील वरिष्ठ संपादकांशी अनौपचारिक संवाद साधणार आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये राहुल गांधींचा दौरा कुठे व्हावा या कारणावरून राडा झाला.

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेस संघटना मजबूत करण्यावर पक्षाचे प्रयत्न असतील. त्यादृष्टीनं राहुल गांधी काही पावलं उचलतात का याकडे मुख्यत: सगळ्यांचं लक्ष असेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close