मराठवाड्यात पहिल्यांदाच मानवी अवयव प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी

January 15, 2016 9:48 AM0 commentsViews:

abad_Awaya34औरंगाबाद – 15 जानेवारी : मराठवाड्याच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच मानवी अवयव प्रत्यारोपणासाठी बाहेर पाठवण्याची घटना घडली आहे. युनाईटेड सिग्मा रूग्णालयातून एका तरुणाचे यकृत आणि किडणी काढून काल पहाटे पाच वाजता मुंबईला पाठवण्यात आले.

मेहकर येथील अपघातात जखमी झालेल्या राम मगर या तरूणाचे हे अवयव होते. राम यांचा मेंदू मृत झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राम मगर यांचे लिव्हर आणि एक किडणी मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयातील एका रूग्णासाठी पाठवण्यात आले. तर किडणी औरंगाबादेतील सेठ नंदलाल धूत रूग्णालयातील रूग्णासाठी एक किडणी पाठवण्यात आली. मानवी अवयव वाहतूक करण्यासाठीचे काही खास नियम आहेत. त्यानुसार सिग्मा रूग्णालय ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक भल्यापहाटे पुर्णपणे थांबवण्यात आली आणि राम मगरचे अवयव पोलीस बंदोबस्तामध्ये विमानतळावर पाठवण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close