‘तारक मेहता..’चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता

January 15, 2016 9:55 AM0 commentsViews:

vishal_thakkar15 जानेवारी : सिनेसृष्टीतला सहाय्यक अभिनेता आणि टीव्ही सिरीयल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करणारा विशाल ठक्कर हा 31 डिसेंबरपासूनच्या रात्रीपासून बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ठाणे घोडबंदर ते मीरा रोड या भागात घडली असल्यानं ठाणे पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यात आलंय.

31 डिसेंबरच्या रात्री विशाल नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अहमदाबादला गेला होता. येताना तो मीरा रोड-घोडबंदर रोडवरच्या फाउंटन हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रीणही होती. तिनं दिलेल्या माहितीनुसार, विशाल आधी अंधेरीमध्ये त्याच्या
मित्राकडे जातो असं सांगून गेला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. अजून त्याचा पत्ता लागलेला नाही. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केली आहेत. त्याचं मोबाईलचं शेवटचं लोकेशन घोडबंदर दिसत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close