‘लगान’मधील ‘गुरन’ साकारणारे राजेश विवेक यांचं निधन

January 15, 2016 10:17 AM0 commentsViews:

rajesh_vivekमुंबई – 14 जानेवारी : बॉलिवुडमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘लगान’ या चित्रपटात गुरन ही धम्माल व्यक्तीरेखा साकारणारे आणि स्वदेस या चित्रपटात पोस्टमास्तर झालेले राजेश विवेक यांचं हद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते.

मुळ उत्तर प्रदेशचे असलेल्या राजेश विवेक यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं.1988 मध्ये छोट्या पडद्यावर भारत एक खोजमधुन त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती आणि 1978 मध्ये जुनून या सिनेमातून बॉलिवूडमध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं. विशेष म्हणजे राजेश विवेक यांच्या छोट्या छोट्या भूमिका कायम लक्षात राहिल्या. लगान, स्वदेस, बंटी और बबली, जोधा अकबर, अग्निपथ, सन ऑफ सरदार या अलिकडच्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close