मुंबईतही ऑड-ईव्हन फॉर्म्युला; हायकोर्टाच्या सूचना

January 15, 2016 7:26 PM0 commentsViews:

asadsad

मुंबई – 15 जानेवारी : दिल्लीप्रमाणे मुंबईतही प्रदूषण कमी करण्याकरता राज्य सरकारने ऑड-ईव्हन डेच्या फॉर्म्युल्याचा गंभीरतेनं विचारा करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्या आहेत. शहदाब पटेल यांनी यासंदर्भातील जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.

खासगी वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि नियमांचे उल्लंघन करत बीएमसीतर्फे जाळण्यात येणारा कचरा यामुळे मुंबईतल्या प्रदुषणाची पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच उपाययोजना केल्या पाहिजेत आशी याचिका शहदाब पटेल यांनी दाखल केलीय.

दिल्लीपेक्षा मुंबईत वाहनांची संख्या कमी असली तरी लहान रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, मुंबईच्या सभोवताली असलेल्या समुद्रामुळे शहर वाढीवर असलेली मर्यादा आणि डिझेलच्या वाहनांचा वाढता वापर यामुळे प्रदुषण वाढत असल्याने सम-विषमचा प्रयोग मुंबईत करण्यात यावा अशी मागणी जनहित याचिका शादाब पटेल यांनी हायकोर्टात दाखल केली. त्यास त्यामुळे दिल्लीप्रमाणेच मुंबईतही प्रदूषण कमी करण्याकरता ऑड-इव्हन डे फॉर्म्युल्याचा विचार करावा, अशा आशयाची याचिका शादाब पटेल यांनी केलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close