संजीव पुनाळेकरांवर गुन्हा दाखल करा, पानसरे कुंटुबीयांची मागणी

January 15, 2016 8:21 PM0 commentsViews:

asdsadsa

कोल्हापुरा – 15 जानेवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मेधा पानसरे यांनी संजीव पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल केलीय. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत.

पानसरे हत्या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा साक्षीदार आहे. ‘त्या साक्षीदाराला सांभाळा’ अशा आशेयाचं पत्रं पुनाळेकरांनी पोलिसांना पाठवलं होतं. तसंच त्यात प्रत्यक्षदर्शीला काही झाल्यास त्याला सनातन संस्था जबाबदार नाही असं म्हटलं होतं.

या प्रकरणी मेधा पानसरे यांनी पुनाळेकरांविरोधात कोल्हापुरातल्या शाहुपुरी पोलीस स्टेशनला जावून पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. तसंच या प्रकरणी पुनाळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना पुनाळेकरांनी ‘मॉर्निंग वॉकला जात चला’ असा धमकीवजा सल्ला ट्विटरवरून दिला होता. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. हा धमकीवजा सल्ला गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाशी लावला जातोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close