पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

January 15, 2016 9:51 PM0 commentsViews:

Petrol

15 जानेवारी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 32 पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर 85 पैशांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती उतरल्यामुळे हे दर कमी करण्यात आले आहेत मात्र, स्वत:चा फायदा करुन घेण्यासाठी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढवला आहे. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या प्रत्येक थेंबागणिक तुमच्या खिशाला चाट बसतो. दोन्ही इंधनांवरील अधिभार वाढवण्यात आला आहे. पेट्रोलवर 30 पैसे प्रति लीटर तर डिझेलवर 1 रुपया 17 पैशांनी अधिभार वाढवण्यात आला आहे. हा अधिभार अबकारी कराच्या रुपाने सरकारी तिजोरीत जमा होतो. तसंच यापूर्वीही केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त शुक्ल वाढवले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close