राहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

January 16, 2016 1:17 PM0 commentsViews:

 

rahul_gandhi mumbaiमुंबई – 16 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मुंबईच्या दुसर्‍या दिवशी एनएम कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेक विषयांवर राहुल यांनी आपली मतं मांडली. आपल्या भाषणात राहुल यांनी मात्र राजकीय विषय टाळले. विकास, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर राहुल बोलले. पण प्रश्नोत्तराच्या वेळेत विद्यार्थ्यांनी राजकीय प्रश्न विचारलेच. जीएसटी विधेयकावर आमच्या 3 अटी आहेत. त्या सरकारनं मान्य कराव्यात आम्ही लगेच जीएसटीला पाठिंबा देऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. तसंच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता, याची आठवणही राहुल यांनी करून दिली.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close