उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रणच नाही, संमेलनाध्यक्षांचा जाहीर माफीनामा

January 16, 2016 1:26 PM0 commentsViews:

 

uddhav thackarey tuljapurपिंपरी चिंचवड- 16 जानेवारी : 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात झालीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीये. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याबद्दल स्वागताध्यक्ष पी.डी.पाटील यांनी जाहीरपण माफी मागितली आहे. उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रण न दिल्याबद्दल पाटील यांनी मी मनापासून माफी मागतो असा माफीनामाच सादर केला.

89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी सज्ज झाली आहे. शरद पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनांचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या भाषणाने साहित्यिक मंत्रमुग्ध झाले. लेखकाला आपलं मत माडण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असं यावेळी गुलजार यांनी म्हटलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close