हॉकीपटू शिवेंद्र सिंग निलंबित

March 1, 2010 12:44 PM0 commentsViews:

1 फेब्रुवारीहॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानला 4-1 ने हरवून स्पर्धेत सुरुवात तर जोशात केली. पण मॅचनंतर टीमला एक धक्का बसला आहे. पाकिस्तानवर पहिला गोल डागणारा शिवेंद्र सिंगवर मॅच रेफरींनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. आणि पुढच्या तीन मॅचसाठी त्याला निलंबित केले. मॅचनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी बाचाबाची केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एका पाक खेळाडूवर शिवेंद्र सिंगने हॉकी स्टिक उगारल्याचेही बोलले जात आहे. मॅच संपल्यानंतर मॅच रेफरींनी प्राथमिक चौकशी करुन शिवेंद्रवर ही कारवाई केली. भारतीय टीम व्यवस्थापनाने या शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

close