राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

January 16, 2016 4:23 PM0 commentsViews:

rahul_gandhi_padyatraमुंबई – 16 जानेवारी : ‘मिशन मुंबई’ असा नारा देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा गड असलेल्या मुंबापुरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. राहुल गांधी यांनी आज वांद्रेच्या नॅशनल कॉलेजपासून ते धारावीपर्यंत भव्य पदयात्रा काढली होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार प्रिया दत्त, शहराध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, बाबा सिद्दीकी यांच्यासह काँग्रेस अनेक बडे नेते या पदयात्रेत सहभाहगी झाले होते. मुंबईकरांना वाढत्या वीजदरांविरोधात काँग्रेसनं ही पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेची सांगता भव्य अशा सभेत झाली. यावेळी राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. काल मुंबई महापालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर बोलल्यानंतर आज धारावीतही राहुल गांधींचं सरकारवरचं टीकासत्र सुरूच होतं. धारावीला मिनी इंडिया म्हटलं जातं असं ऐकलं होतं, याची आता जाणीव होतेय असं राहुल गांधी म्हणाले. मुंबईत वीजेचे दर वाढतायत, पण त्यावर राज्य सरकार काहीच करत नाहीये असं ते यावेळी बोलताना म्हणाले. तसंच केवळ मुंबईच नाही तर अख्ख महाराष्ट्रच दुर्लक्षित झालंय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही याला जबाबदार असल्याची टीका राहुल गांधींनी केली. पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही पदयात्रा म्हणजे काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन असल्याचं दिसून आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close