आदिवासींची होळी अंधारात

March 1, 2010 1:11 PM0 commentsViews: 5

प्रवीण मनोहर, अमरावती1 फेब्रुवारीदेशात सगळीकडे होळी साजरी होत असताना, मेळघाटातील आदिवासींना मात्र होळी मात्र अंधारात साजरी करावी लागली. रोजगार हमीच्या कामाचा मोबदलाही अजूनही त्यांना मिळालेला नाही. मेळघाटातील कोरकूंसाठी होळी सण महत्त्वाचा मानला जातो. पण याच सणासाठी हातात पैसा नसल्याने आदिवासींच्या आनंदावर विरजण पडले. चिखलदरा तालुक्यातील आदिवासींना रोजगार हमीच्या कार्यक्रमांतर्गत काम मिळाले. पण कामाचे पैसे मिळालेच नाहीत. सण आला आणि गेला…जवळपास 9 हजार आदीवासी स्त्री पुरुषांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. आम्ही रोजगार हमीच्या कामाचे मायक्रो प्लॅनिंग केल्याचे जिल्ह्याधिकारी रुचा बागल सांगतात. पण हे प्लॅनिंग फिसकटले आहे. सलग आलेल्या सुट्यांसंदर्भात नियोजन का नाही? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मिळेल. पण कष्टकरी आदिवासींच्या जीवनातले हरवलेले आनंदाचे क्षण मात्र सरकारी यंत्रणा भरून देऊ शकणार नाही.

close