अकोल्यात रंगला ‘दंडा जोडणी’

March 1, 2010 1:30 PM0 commentsViews: 28

1 फेब्रुवारीहोळीचा सण अकोल्यातील बंजारा तांड्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. डफाच्या तालावर बंजारा महिलांनी ताल धरला आणि सारा तांडा होळीच्या रंगात न्हाऊन गेला. आबालवृद्ध या नाचगाण्यात सहभागी झाले. महिलांनीही गाणी म्हणत फेर धरला. दंडा जोडणी नाच या गरब्यासारख्या नाचाच्या प्रकारात पुरुष समाजातील महापुरुषांची गौरवगीते म्हणतात. प्रेयसीला आकर्षित करण्याचा, तिची थट्टा मस्करी करण्याचा ही मंडळी प्रयत्न करत असतात. पण आता ही संस्कृती लोप पावतेय अशी काळजीही या लोकांना वाटत आहे. नाचणारे थकले तर मग रंगते ती लेंघी. रात्रभर 'होली है भाई होली है' म्हणत बंजारा लोक बेहोष होऊन नाचत होते.

close