जावईबापूंची गाढवावरून धिंड

March 1, 2010 1:48 PM0 commentsViews: 9

1 फेब्रुवारीबीड जिल्ह्यातील विडा येथील गावकर्‍यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीची एक आगळीवेगळी परंपरा जपली. आणि ती म्हणजे आपल्या जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची… लग्नात घोड्यावर मिरवण्यासाठी रुसून बसलेले जावईबापू मुकाट्याने गाढवावर बसले. बेपत्ता असलेल्या जावयाला शोधून आणले गेले. एक गाढव आणले गेले. त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. जावईबापूंना सन्मानाने त्याच्यावर बसवले गेले. आणि गावातून मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी एकमेकांचे कपडे फाडून जावयाच्या मिरवणुकीत आनंदाने नाच केला.ही परंपरा निजामकाळापासून गावात सुरू असल्याचे गावकरी सांगतात. गंमत म्हणजे धिंड काढण्याच्या भीतीने जावई दोन दिवस अगोदरच पसार होतात.पण उत्सव समितीने नेमलेले शोध पथक जावायला शोधून आणते. आणि त्याची मिरवणूक वाजत गाजत काढते..!

close