तस्लिमा नसरीन यांच्या लेखावरून कर्नाटकात तणाव

March 1, 2010 2:04 PM0 commentsViews: 79

1 फेब्रुवारीबांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या पैगंबरांबद्दलच्या लेखावरून कर्नाटकात तणाव निर्माण झाला आहे.शिमोगा आणि हासनमध्ये तर लावला कर्फ्यूही लावण्यात आला आहे. तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शिमोगामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या कन्नडप्रभा या कन्नड वर्तमानपत्रात तस्लिमा यांचा एक लेख छापून आला आहे. त्यात त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर बुरख्याच्या विरोधात होते, असे म्हटले आहे. पैगंबर स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, असेही नसरीन यांनी लिहिले आहे. त्यांच्या या लेखाविरोधात शिमोगा, धारवाड आणि हासनमध्ये तीव्र निदर्शने झाली.यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शिमोगामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

close