अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी अॅम्ब्युलन्स बोटचं उद्घाटन

January 17, 2016 4:55 PM0 commentsViews:

नंदुरबार – 17 जानेवारी : नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातील आदिवासींना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या पहिल्या अद्ययावत अॅम्ब्युलन्स बोटचं युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या हस्ते नुकतचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

boat ambulance13

सरकारने सातपुडा पर्वत रांगातील नर्मदा काठावर, दीड कोटी रुपये खर्चून 5 खाटांचा दवाखाना उभारला आहे. नर्मदा काठावरील आदिवासींना दळणवळणाचे मुख्य साधन नसल्याने नर्मदा नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते आसते. या ठिकाणी आरोग्य सेवेचा प्रश्न असल्याने बालमुत्यू, कुपोषण अशा अनेक समस्यांना इथल्या रहिवास्यांना सामोर जावं लागतं.

गडचिरोली जिल्ह्यात मुलाचा मृतदेह घेऊन बापाला दहा किलोमीटर चालायला लागल्यानंतर प्रशासनाची आणि सरकारची संवदेनहिनता चव्हाट्यावर आली होती. त्या पार्श्वभूमीवर, अतिदुर्गम भागातील औषधोपचारासोबत अत्यावश्यक काळात अॅम्ब्युलन्स म्हणून हा तरंगता दवाखाना काम करणार आहे. अशाच पद्धतीने या बोट ऍम्ब्युलन्स कोकण आणि गडचिरोलीतह सुरु करणार असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close