पेट्रोल दरवाढीवरून मतभेद

March 1, 2010 2:20 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारीपेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर कमी करण्यावरून आता सरकारमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे.मित्रपक्षांच्या वाढत्या दबावामुळे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी तेलाचे दर कमी करण्याचे संकेत दिलेत. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र तशी शक्यता फेटाळली आहे. तेलाच्या वाढलेल्या दराचा महागाईवर फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरून बजेटच्या वेळी विरोधकांनी केलेल्या सभात्याग चुकीचा असल्याचे त्यांनी सौदी अरेबियात बोलताना म्हटले आहे. विरोधकांसह तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या मित्रपक्षांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांना तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर यूपीएतील घटक पक्षांशी चर्चा करण्याचा प्रणवदांचा विचार आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची उद्या बैठक होणार आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मागे घेण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.दरवाढीचा घेतलेला निर्णय बदलण्याची पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबतच प्रणव मुखर्जी यांचीही इच्छा नाही. पण राजकीय दबावामुळे आर्थिक मुद्दा मागे ठेवणे त्यांना भाग पडत आहे

close