चित्रिकरण वादानंतर आशा भोसलेंनी व्यक्त केली दिलगिरी

January 18, 2016 1:02 PM0 commentsViews:

पिंपरी- 18 जानेवारी :  पिंपरी इथे सुरू असलेल्या 89वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सुरू झालेल्या प्रसारमाध्यमांच्या रेकॉर्डिंगच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पत्रकारांनो, मला माफ करा. तुमच्या आजीच्या वयाची आहे हो मी, असं म्हणत आशा भोसले यांनी प्रसारमाध्यमांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

asha bhosle contro
रविवारी संध्याकाळी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच ‘आशा भोसले संगीत रजनी’चं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर, प्रसारमाध्यम आणि प्रेक्षक त्याचं चित्रिकरण करत असल्याचं आशा भोसले यांच्या निदर्शनास आलं, आणि त्यांनी त्यास आक्षेप घेत, कार्यक्रमाचं चित्रिकरण आयोजकांमार्फतच करण्यात यावं, अशी ठाम भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांना बाहेर काढल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणार नसल्याचं सांगत त्या स्टेजवरून खाली उतरल्या. यामुळे काही काळ कार्यक्रमही थांबवला होता. त्यानंतर खासगीरीत्या होत असलेलं चित्रिकरण थांबल्यानंतर आशा भोसले यांनी कार्यक्रम पुन्हा जोशात सुरू केला. मात्र, आयोजकांनी प्रसारमाध्यमांना कॉपीराईटची पूर्वकल्पना का दिली नाही, असा सवाल माध्यमप्रतिनिधींनी विचारल्यानंतर, घडलेल्या सर्व प्रकारावर आशा भोसलेंनी दिलगिरी व्यक्त केली. त्यासोबतच घडलेल्या प्रकाराबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनीही पत्रकारांची माफी मागितली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close