जव्हार : डॉक्टरांअभावी सफाई कामगारच देतोय गोळ्या, इंजेक्शन

January 18, 2016 2:01 PM0 commentsViews:

जव्हार – 18 जानेवारी : दाभेरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सफाई कामगारच रुग्णांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून दाभेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराची नियुक्ती करण्यात आली नसल्याने तिथले सफाई कामगारचं आता डॉक्टरची भूमिका बजावत आहेत. केवळ 9 वी पास असलेल्या सफाई कामगाराला औषधे देण्याची ताकीद वरिष्ठ डॉक्टर्सनीच दिल्याचं त्याचं म्हणणं आहे.

sadasa

या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी महाराष्ट्र प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण इतके पैसे खर्च करूनही या आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

दाभेरी हे गाव अतिदुर्गम डोंगर दर्‍यात असल्याने रुग्णांना उपचरासाठी 40 किमी लांब असलेल्या जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं नाहीतर 80 किमीवरील सिल्व्हासाला जावं लागतं. रात्री अपरात्री काही झाल्यास दळणवळणच्या सुविधाही पुरेशा उपलब्ध नसल्याने या आदिवासींना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. जव्हार तालुक्यात अशी अनेक आरोग्य केंद्र असून ती डॉक्टर्स अभावी ओस पडलेली आहेत.

दरम्यान, या संदर्भात सरकार आणि शासन यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी द्यावे अशी मागणी आता स्थानिक करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close