धुळवडीच्या धुंदीचे मुंबईत 5 बळी

March 1, 2010 2:33 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीमुंबईत सगळीकडे धूलिवंदनाची धूम सुरु असताना आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी समुद्रात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला.विरारच्या अर्नाळा समुद्राकिनार्‍यावर धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.या तिघांचा तातडीने शोध सुरू करण्यात आला, पण अखेर त्यांचे मृतदेहच हाती लागले. मृतांमध्ये विरारच्या हरीश सिंग आणि पदम्‌सिंग या 25 वर्षांच्या तरुणांचा समावेश आहे. तर सायनच्या लॉरेन्स या 21 वर्षांच्या तरुणानेही आपला जीव गमावला आहे.दुसरीकडे अक्सा बीचवरही धुळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.मद्यपी चालकांवर कारवाईदुसरीकडे आज धुळवडीच्या झिंगेत गाडी चालवणार्‍या 407 जणांना पोलिसांनी हिसका दाखवला. दारू पिऊन गाडी चालवल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

close