भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे

January 18, 2016 6:26 PM0 commentsViews:

Danve

मुंबई – 18 जानेवारी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. तत्पुर्वी रात्री उशिरा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दानवे यांनी  नागपूरात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्याने रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. पण, प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवेंना फक्त 10 महिन्याचा कालावधी मिळाला होता. आता त्यांना 3 वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close