उद्धव ठाकरेच लुटतायेत मोकळे भूखंड – संजय निरुपम

January 18, 2016 9:20 PM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई

मुंबई – 18 जानेवारी : मुंबईतल्या मोकळ्या मैदानांमध्ये आता राजकीय कुस्तीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी थेट, उद्धव ठाकरे हे मुंबईच्या जमिनी लुटत असल्याचा आरोप केला आहेत. त्याच सुमारास बीएमसीनं दत्तक तत्वावर दिलेल्या 216 जमिनीं परत घेण्यासाठी आज नोटीस बजावल्या. पण हे करताना काळजीवाहू तत्वावर असलले 9 मोठे भुखंडांना मात्र हात लावला नाही. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेले तीनही भुखंड परत केले. पण सेनेचे बडे नेते त्यांच्याकडे असलेले भुखंड परत करणार का? असा सवाल पालिका वर्तुळात विचारला जातं आहे.

fsadfas
शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीने वादग्रस्त मैदान दत्तक योजनेला मंजुरी दिल्यामुळे शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका होतेय. उद्धव ठाकरेंनी या विषयावर सारवासारव केलीये. पण त्याने विरोधकांचं समाधान झालं नाहीये. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय की ते मुंबईचे भूखंड लुटत आहेत.

सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर अखेर बीएमसीने सोमवारी दत्तक दिलेले 216 भूखंड परत करण्यासाठी नोटिसा बजावल्या. विशेष म्हणजे यात आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या MDFAही समावेश आहे. त्याच बरोबर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आ. सुनिल प्रभू, खा. गजानन कीर्तिकर, विनोद घोसाळकर, यांनाही नोटिसाह बजावल्या जाणार आहेत. पण यात काळजीवाहू तत्वावर दिलेल्या 9 नेत्यांच्या भूखंडांना नोटिसांमधून वगळलंय. याचा फायदा उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि राज्य मंत्री रवींद्र वायकर यांना झाला आहे. याविरुद्ध मनसे आंदोलन करणारे.

दरम्यान, भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेले तिन्ही भुखंड परत केले. शेट्टींच्या पोईसरमधल्या मैदानाची बातमी आयबीएन लोकमतने लोकांसमोर आणली होती. पण बीएमसी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध सगळे असं चित्र मैदानांच्या मुद्द्यावरून निर्माण झालं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close