आर. आर. आबांचा घरचा आहेर…

March 1, 2010 2:49 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारीधान्यापासून दारुनिर्मितीची घाई करण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सहकारी तत्त्वावर उभे करा. त्यात खासगी उद्योगपतींना घेऊ नका, असा सल्ला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. धान्यापासून दारुनिर्मिती करण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली होती. दारूनिर्मितीच्या या उद्योगात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी 'रस' घेतला होता.सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, समाजसेवक अभय बंग आदींनी आक्षेप घेतला होता. यावर मध्यंतरी जोरदार बौद्धिक संघर्षही झडला. सत्ताधारी आणि विरोधकांचेही या प्रकल्पामध्ये हितसंबंध गुंतल्याने या निर्णयाला फारसा राजकीय विरोध होत नव्हता. पण आता आर. आर. आबांनी या विषयावर सल्ला दिल्याने आता नवाच वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

close