टेनिसमध्ये मॅच फिक्सिंग? आघाडीचे खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात

January 19, 2016 9:57 AM0 commentsViews:

18 जानेवारी : गेल्या काही वर्षांपासून मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या बातम्यांनी क्रिकेटचं विश्व ढवळून निघालं असताना टेनिसविश्वात फिक्सिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

balls_2763171b

जागतिक टेनिसमध्ये वरच्या पातळीला मोठ्या प्रमाणात मॅच फिक्सिंग सुरू असल्याचं वृत्त बीबीसी आणि बझफीड न्यूज यांनी दिलं आहे. गेल्या दशकभरात जागतिक टेनिसच्या अव्वल 50मधील 16 टेनिसपटू, ज्यामध्ये ग्रँडस्लॅम चॅम्पियन्सचाही समावेश आहे, अशा टेनिसपटूंवर सामने फिक्स केल्याचा संशय असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे. यामुळे अपेक्षेप्रमाणे टेनिस जगतात खळबळ उडाली आहे.

बीबीसी आणि बझफीड यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटना गेल्या दहा वर्षांपूर्वीच्या आहेत. 2007 मध्ये एटीपीने फिक्सिंग प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या समितीची ही गुप्त कागदपत्रं CNN-IBNच्या हाती लागली आहेत. इटली आणि रशियामधून मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. त्यामध्ये विम्बल्डनसह इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांचाही समावेश आहे. यामध्ये गुंतलेल्या 8 खेळाडूंची नावं सातत्यानं समोर येत असून त्यापैकी काही खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये खेळत आहेत, अशीही माहिती आहे. एवढचं नाही तर महत्त्वाच्या स्पर्धा सुरू असताना या खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमधल्या रुममध्ये गाठलं जातं अशीही माहिती हाती लागली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close