कोकण किनारपट्टीची सुरक्षा वाढवली

March 2, 2010 9:10 AM0 commentsViews: 2

2 फेब्रुवारीश्रीलंकेच्या बोटींचा वापर करुन काही दहशतवादी कराचीकडे येणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरची सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सध्या किनारपट्टीवर 12 गस्तीनौका दिवसरात्र पेट्रोलिंग करत आहेत. किनारपट्टीलगतच्या गावांमधील सर्व सागररक्षक आणि मच्छिमारांना दक्ष राहण्यास सांगितले गेले आहे.

close