मसूद अझरला ताब्यात घेण्यासाठी भारताचा पाकिस्तानवर दबाव

January 19, 2016 1:41 PM0 commentsViews:

masood_Azhar

19 जानेवारी : भारतानं पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरसह इतर 20 दहशतवाद्यांची ‘डॉसीअर’ अर्थात इत्यंभूत माहिती असलेल्या कागदपत्रांची फाईल तयार केली आहे. लवकरच ही ‘डॉसीअर’ पुराव्यांच्या रूपात पाकिस्तानला देण्यात येणार आहे.

मसूद अझरविरोधात भारतानं 65 पानांचं एक डॉझियर तयार केलं आहे. त्यामध्ये अझरच्या गेल्या 16 वर्षांतल्या कारवाया आणि फंडिंग यांची पुराव्यासकट माहिती आहे.

भारतातर्फे 20 मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मसूद अझर पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर हाफिज सईद, तिसऱ्या स्थानावर जकीउर रहमान लखवी आणि चौथ्या क्रमांकावर दाऊद इब्राहिमचं नाव आहे.

पाकिस्ताननं मसूदला भारताच्या ताब्यात द्याव हाच भारताचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी भारत पाकिस्तानवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close