खाप पंचायत, मदत घेणा-या नातेवाईकांवरही पंचायतीकडून बहिष्कार

January 19, 2016 6:54 PM0 commentsViews:

jaat panchyatनाशिक – 16 जानेवारी : जात पंचायतीचा फास काही सुटता सुटेना अशा एका कुटुंबाला जात पंचायतीच्या जाचक अटीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कुटुंबाने ज्यांचा आसरा घेतला त्यांच्यावरही जात पंचायतीने बहिष्कार टाकलाय.

गोंधळी समाजाच्या जात पंचायतीनं एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. वाळीत टाकलेलं हे कुटुंब परभणीतलं आहे. दिपक  मोरे आणि त्यांच्या पत्नीला वाळीत टाकण्यात आलं आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर या कुटुंबाला वाळीत टाकल्यानंतर हे कुटुंब
नाशिकमधील त्यांच्या नातलगांकडे आश्रयाला गेलं. तर मोरे कुटुंबाला आश्रय दिला म्हणून नाशिकमधील गोंधळी समाजाच्या कुंटुंबालाही वाळीत टाकण्यात आलं आहे.

पैशांच्या व्यवहारावरुन मोरे कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. मोरे कुटुंबाने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात जातपंचायतीने अवाच्या सव्वा व्याज लावलं याला मोरे कुंटुंबाने विरोध केला म्हणून त्यांना परभणीमधील जात पंचायतींने दमदाटी करत वाळीत टाकलं. या विषयाला घेऊन नाशिकमधील जात पंचांनी सामजस्याची भूमिका घेतली पण परभणीतील पंचांकडून दाद मिळत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close