सावरकरांना भारतरत्न का ?, ‘द वीक’ने ठरवले सावरकरांचे दावे खोटे

January 19, 2016 8:36 PM0 commentsViews:

the_week_savarkar2

मुंबई – 19 जानेवारी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होतेय. अनेक सावरकरवाद्यांनी तशी मागणी केलीये.  पण ‘द वीक’ या इंग्रजी नियतकालिकाने सावरकरांच्या स्वातंत्र्ययुद्धातल्या योगदानावर सखोल अभ्यास करून कव्हर स्टोरी केली आहे. या बातमीमुळे नवा वाद निर्माण झालाय. सावरकरांच्या आयुष्यात अनेक विरोधाभास होते, असा दावा या बातमीने केलाय. अशा व्यक्तीला भारतरत्न द्यावं का, असा प्रश्नही या नियतकालिकात उपस्थित केलाय.

‘माझी जन्मठेप’मध्ये माफीच्या अर्जांची नोंद नाहीय. तर अंदमानमधून 7 वेळा माफीचे अर्ज केल्याचं द वीकने म्हटलंय. सावरकरांनी जेलमध्ये आंदोलनं केल्याचे आत्मचरित्रात उल्लेख आहे. तर द वीकमध्ये म्हटलंय की समकालीन कैदी सांगतात सावरकरांनी एकही आंदोलन केलं नाही.  एवढंच नाहीतर 1857 च्या संग्रामावर लिहिलेल्या पुस्तकात हिंदू-मुस्लीम नेतृत्वाचा गौरव केलाय. तर 15 वर्षानंतर हिंदुत्वावर पुस्तक लिहून आधीची भूमिका पूर्णपणे बदलल्याचा दावा द वीकने केलाय. त्यामुळे आता एका नवीन वादाला सुरूवात झालीय.

सावरकरांच्या आयुष्यातले  विरोधाभास?

- अंदमानचा माफीनामा
- ‘माझी जन्मठेप’मध्ये माफीच्या अर्जांची नोंद नाहीय. तर
- अंदमानमधून 7 वेळा माफीचे अर्ज केल्याचं द वीकने म्हटलंय.

- जेलमधील उठाव कधी?
- जेलमध्ये आंदोलनं केल्याचे आत्मचरित्रात उल्लेख आहे. तर द वीकमध्ये म्हटलंय की
- समकालीन कैदी सांगतात सावरकरांनी एकही आंदोलन केलं नाही.

- कोलूला जुंपलं नाही?
- ‘माझी जन्मठेप’मध्ये अंगमेहनतीची कामं केल्याचं लिहिलंय. मात्र
- जेलमधल्या नोंदीनुसार त्यांना कोलूचं नाही तर दोर वळण्याचं काम दिलं जायचं द वीक नं म्हटलंय.

- जेलमधली वागणूक
- जेलरशी भांडायचो, युक्तिवाद करून गप्प बसवायचो, असं आत्मचरित्रात ते लिहिलंय. मात्र त्यांची जेलमधली वागणूक अत्यंत नम्र, सभ्यपणाची होती अशी नोंद आहे.

- द्विराष्ट्रवाद
- 1937 आणि 1940 साली द्विराष्ट्रवादाला पाठिंबा दिला
- नंतर पाकिस्तानच्या निर्मितीवरून सावरकरवाद्यांनी गांधीजींना लक्ष्य केल्याचं द वीक म्हटलंय.

- धर्मनिरपेक्ष?
- 1857 च्या संग्रामावर लिहिलेल्या पुस्तकात हिंदू-मुस्लीम नेतृत्वाचा गौरव केलाय. तर
- 15 वर्षानंतर हिंदुत्वावर पुस्तक लिहून आधीची भूमिका पूर्णपणे बदलल्याचा दावा द वीकने केलाय.
त्यामुळे आता एका नवीन वादाला सुरूवात झालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close