बॉलिवूडची खबरबात…

January 19, 2016 9:17 PM0 commentsViews:

बॉलिवूडकरांनी या आठवड्यात केलेल्या काही गंमती जमंती…नुकतंच लग्न झालेल्या कबीर बेदीने आपल्या वाढदिवस आणि लग्नानिमित्त पार्टी दिली होती त्या पार्टीमध्ये सलमान खान, सुष्मिता सेन यांनी हजेरी लावली होती. कबीर बेदीने परवीन दुसांजशी लग्न केलं. तर अभिनेता रणदीप हुडाने 9 घोडे अॅनिमल वेलफेर एनजीओकडून त्यांच्या पुर्नवसनासाठी दत्तक घेतले आहे. रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉन 2016 मध्ये कॅटरिना कैफची उपस्थिती लक्षणीय होती. तिच्यासह आर माधवन, गुलशन ग्रोव्हर आणि इतर सेलिब्रिटी सामील झाले होते. तर दुसरीकडे अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी बॅडमिंटन लीगला भेट दिली आणि स्वत:ही खेळून आनंद लुटला. अक्षय कुमार आणि अमरीत कौर त्यांच्या येत्या ‘एअरलिफट’फिल्मच्या प्रमोशनसाठी सज्ज झालेले दिसतायत. सनी लिऑन पण तिच्या ‘मस्तीजादे’च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात गेली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close