अमर भाटिया यांची आत्महत्या नाही खून ?

January 19, 2016 9:46 PM0 commentsViews:

Amar Bhatiya231किरण सोनवणे, उल्हासनगर – 19 जानेवारी : ठाणे जिल्ह्यातले बिल्डर अमर भाटिया यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण लागू शकतं. भाटियांचे मित्र आणि उल्हासनगरमधले बिल्डर राम वाधवा यांनी संशय व्यक्त केलाय की, भाटियांचा खून झालेला असू शकतो. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केलीये.

“शुक्र करो की दर्द सहते है लिखते नहीं
वर्ना कागजों पे लफ्जों के जनाजें उठते…”

अमर भाटियांनी 10 डिसेंबरला फेसबुकवर लिहिलेल्या शायरीवरून त्यांची तेव्हाची मनस्थिती लक्षात येतेय. हे लिहिल्यानंतर महिन्याभरातच त्यांनी बदलापूरजवळ गाडी खाली जीव दिला. भाटियांनी घरातून निघतांना त्यांच्या मामांना आत्महत्येबद्दलचा एसएमएस केला होता. पण भाटियांचा खून झालेला असू शकतो, असा संशय त्यांचे मित्र आणि उल्हासनगरमधले बिल्डर राम वाधवांनी व्यक्त केलाय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केलीये.

आत्महत्येपूर्वी भाटियांनी मदतीसाठी ठाण्याच्या कलेक्टर अश्विनी जोशींनी पत्र लिहिलं होतं, अशा बातम्या काही वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. पण असं कोणतंही पत्र मला मिळालं नाही, असं अश्विनी जोशींनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. भाटियांच्या
उल्हासनगरमधल्या घरी तिस-या दिवशीचा पगडीचा कार्यक्रम पार पडलाय. आता पोलीस तपासाला वेग येईल. पण परमार आणि भाटियांसारखे अनेक बिल्डर्स आत्महत्या करतील, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करतायत.

भाटियांनी आत्महत्या केलीये की त्यांचा खून झाला, हे पोलीस अजूनही स्पष्टपणे सांगत नाहीयेत. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातल्या बिल्डरने थेट मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close