श्रीहरीकोटा इथून ‘PSLV-C31’चं यशस्वी प्रक्षेपण

January 20, 2016 10:03 AM0 commentsViews:

isro-pslv 28

श्रीहरीकोटा  -20 जानेवारी : इस्रोच्या इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम म्हणजेच आयआरएनएसएस-11 या पाचव्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘पीएसएलव्ही-सी 311 या रॉकेटमधून आज सकाळी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालं. चेन्नईहून सुमारे 100 किमी दूर असलेल्या श्रीहरीकोटा इथून आज (बुधवारी) सकाळी 9 वाजून 31 मिनिटांनी या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले. 44.4 मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे एकूण वजन 1 हजार 425 किलो इतकं आहे.

ही उपग्रहांची यंत्रणा अमेरिकेतल्या जीपीएस प्रणाली प्रमाणे काम करणार आहे. यामुळे भविष्यात अमेरिकेच्या GPS प्रणालीची जागा ही स्वदेशी मिनी GPS यंत्रणा घेईल.

भारतानं आत्तापर्यंत चार उपग्रह (आयआरएनएसएस-1ए, 1बी, 1सी आणि 1डी) लाँच केलं आहेत. 1 जुलै 2013 साली आयआरएनएसएस-1ए, तर एप्रिल 2014 मध्ये आयआरएनएसएस-1बी प्रक्षेपित करण्यात आलं. 16 ऑक्टोबर 2014 साली आयआरएनएसएस- 1सी आणि 28 मार्च 2015 मध्ये आयआरएनएसएस-1डी चे यशस्वी प्रक्षेपण झालं.

 IRNSS-1E चं प्रक्षेपण – स्वदेशी जीपीएस प्रणाली

– 7 उपग्रहांच्या समुहाचं प्रक्षेपण
– एकूण वजन 1,425 किलो
– अमेरिकेतल्या जीपीएस प्रणाली प्रमाणे काम करणार
– 2013पासून IRNSS उपग्रहांची मालिका
– भविष्यात अमेरिकी जीपीएसची जागा घेणार
– वाहनं, पुरातत्व विभाग, दुर्गम भागात सेवा, प्रवासी विमान सेवा यासाठी वापर
– भारतीय उपखंडात अचूक स्थान, वेळ समजणार
– संरक्षण दल, आपत्कालीन व्यवस्था, वैज्ञानिक प्रयोगासाठी फायदा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close