स्पेशल रिपोर्ट : औरंगाबादमध्ये शिवना टाकळी प्रकल्प अर्धवट राहिल्यानं शेतकरी हैराण

January 20, 2016 12:11 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद – 20 जानेवारी : राज्यात अनेक सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत. अर्धवट प्रकल्पांमुळं शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही. मात्र शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेलेत. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. पाणी असून शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही कि शेतीसाठी पाणी मिळत नाही.

ÖêÆüßÖê»ÖãÖê¾ÖÖêË23

हा आहे कन्नड तालुक्यातला शिवना टाकळी सिंचन प्रकल्प. हा प्रकल्प अर्धवटच राहिल्यानं शेतकरी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी देवून पस्तावलेत. कारण प्रकल्प उशापाशी असून शेतकरी तहानलेले आहेत. त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. कारण धरण बांधले मात्र धरणातून पाणी वाहून नेणारे कालवेच बांधले नाहीत, ते अर्धवट सोडले.

शिवना टाकळी हा प्रकल्प 1981 साली सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची किंमत सुरवातीला केवळ आठ कोटी होती. आज या प्रकल्पाची किंमत अंदाजे 228 कोटी झालीय. प्रकल्पावर आजपर्यंत 180 कोटी खर्चही झाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून साडे सहा हजार हेक्टर शेतीचं सिंचन आणि जवळपास 35 गावांच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन होतं. प्रकल्प अर्धवट सोडल्यानं दोन्ही उद्दिष्ट आजपर्यंत पूर्ण होवू शकलेले नाहीत.

शिवना टाकळी प्रकल्पामध्ये कशा चुका झाल्यात त्या बद्दल चितळे समितीनंही आढावा घेतला आहे.

हा शिवना टाकळी प्रकल्प अनोखा असाच म्हणावा लागेल. प्रकल्प अर्धवट बांधून तयार आहे. मात्र यातून पाणी वाहून नेणारे कालवेच बांधले नाहीत. त्यामुळं सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे. पैसा तर पाण्यासारखाच खर्च झालाय. पण पाणी कुठं आहे?

रखडलेला शिवना टाकळी प्रकल्प

- 1981 साली शिवना टाकळी प्रकल्प सुरु झाला
– प्रकल्पाची किंमत सुरुवातीला केवळ 8 कोटी होती
– सध्याची प्रकल्पाची किंमत पोहोचलीय अंदाजे 228 कोटींवर
– प्रकल्पावर आजपर्यंत 180 कोटी रुपये खर्चही झालेत
– या प्रकल्पामुळं साडे हजार हेक्टर सिंचनाखाली येणार होता
– 35 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close