पेट्रोल, डिझेल दरवाढीवरून विरोधक आक्रमक

March 2, 2010 1:06 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्यावरून यूपीएतील मित्रपक्षांत मतभेद निर्माण झाले आहेत. दरवाढ मागे घेणार नसल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनीही पंतप्रधानांच्या भूमिकेला दुजोरा दिला. आता यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची यावर काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयबीएन-नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार डिझेलच्या किंमतीत किरकोळ कपात होणार असल्याचे समजते. पण पेट्रोलच्या किंमती मात्र कायम राहणार आहेत.सोनिया गांधी काँग्रेसच्या संसदीय समितीच्या उद्या होणार्‍या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करतील. काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. दरम्यान दरवाढीविरोधात देशभरात भाजप आणि तेलगू देसम यांची निदर्शने सुरू आहेत.

close