दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं शिक्षण अवघड, विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क दुपट्टीने वाढवले

January 20, 2016 5:05 PM0 commentsViews:

aurangabad_univercityऔरंगाबाद – 20 जानेवारी : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या भरात भर पडलीये.  शेतात काही पिकलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं कठीण झालं असतांनाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानं व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये दुपट्टीनं वाढ केली आहे.

आधी वार्षिक शुल्क आकारले जात होते. मात्र हे शुल्क सत्रांमध्ये द्यावं लागणार आहे. बीबीएसाठी आधी 8500 शुल्क होता आता तो थेट 23 हजारावर वाढवला. बीसीएमसाठी आधी 6000 शुल्क होते ते आता 14 हजारांपर्यंत वाढवले आहे. अशा अनेक कोर्सेसमध्ये दुपट्टीनं वाढ झाल्यानं ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close