रोहितची आत्महत्या ही दलित विरुद्ध सवर्ण संघर्ष नाही -इराणी

January 20, 2016 5:44 PM0 commentsViews:

smruti_iraniनवी दिल्ली – 20 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठाचा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या म्हणजे दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष नाही, असा दावा मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलाय. तसंच अनेक घटनांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोपही स्मृती इराणींनी यावेळी केलाय.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्मृती इराणींनी हा दलित किंवा सवर्ण असा मुद्दा नाही. रोहितच्या आत्महत्येमुळे आपणही अस्वस्थ झालोय. मुळात हे प्रकरण मारहाणीतून झालंय असा खुलासा इराणी यांनी केला. विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता वादानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे हॉस्टेल वार्डने रोहित आणि त्यांच्या मित्रांना हॉस्टेल खाली करण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी हॉस्टेलखाली केलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ निलंबित करण्यात आलं होतं आणि विद्यापीठानं नियमानुसारही कारवाई केली, असंही स्मृती इराणींनी म्हटलंय. तसंच रोहितच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचं  नाव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close