वसईत 53 गावांसाठी आंदोलन

March 2, 2010 1:16 PM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारी वसई विरार महानगर पालिकेतून 53 गावे वगळावीत म्हणून वसई जनआंदोलन समितीचे प्रणेते आणि आमदार विवेक पंडीत यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. वसईच्या तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरु झाले आहे. जुलै 2009 मध्ये वसई विरार महानगरपालिका स्थापन करताना त्यातून वसई विरार सोबत 53 गावे वगळण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. त्यावेळीही वसई जन आंदोलन समितीने आंदोलन केले होते. पण 10 महिन्यांनंतरही आश्वासन पूर्ण न झाल्याने हे आंदोलन आज पुन्हा सुरु करण्यात आले. या आंदोलनात काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

close