‘मेक इन महाराष्ट्र’ला ‘शॉक’, वीज दरवाढीमुळे उद्योगधंदे चालले राज्याबाहेर

January 20, 2016 10:51 PM0 commentsViews:

प्राजक्ता पोळ, मुंबई -20 जानेवारी : एकीकडे मुख्यमंत्री ‘मेक इन महाराष्ट्र’ ची स्वप्न दाखवतायेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातले उद्योग दुसर-या राज्यात जाण्याची परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्रात औद्योगिक वीजेचा दर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासावर होतोय. मागच्या पाच वर्षात राज्यात औद्योगिक विकासाची घट झालीये. याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट

‘मेक इन महाराष्ट्र’ची ही जाहिरात सध्या सगळीकडे दिसतेय. पण उद्योगांना वर्षभरापूर्वीच दिलेल्या आश्वासनांचा भाजप सरकारला विसर पडलाय की काय असा प्रश्न पडू लागलाय. महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,  कर्नाटक या राज्यांच्या तुलनेत 35 टक्यांनी जास्त आहेत. त्यामुळे राज्यातल्या उत्पादनाची किंमत जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग करणं परवडत नाहीत, अशी तक्रार उद्योगपती करताय.make_in_maharashtra

महावितरणच्या आकडेवारी नुसार उद्योगात विजेची मागणी दरवर्षी कमी होत चालली आहे. औद्योगिक विकासाप्रमाणे हे प्रमाणं 5 टक्यांनी वाढणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातला औद्योगिक विकास घटल्याचं चित्र आहे. पण सरकार हे मान्य करायला तयार नाही. त्याचबरोबर उद्योगांना येत्या अर्थसंकल्पात सबसिडी देण्याचा विचार असल्याचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलंय.

या बजेटमध्ये तरी आपली मागणी मान्य व्हावी म्हणून उद्योगपतींनी ऊर्जामंत्री बावनकुळे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंसोबत बैठक केली. पण उद्योगांची सबसिडीची मागणी सरकारला पटली नाही. या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. मेक इन इंडियाच्या स्पर्धेत प्रत्येक राज्य स्पर्धेत उतरलं असताना आता राज्य सरकार काय भूमिका घेतं, याकडे सगळा देश लक्ष लावून आहे.

औद्योगिक विजेची मागणी घटली

2010-11
25, 151 दशलक्ष युनिट

2014-15
25, 051 दशलक्ष युनिट

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close