आवक वाढली, भाज्यांचे दर घसरले

January 20, 2016 11:01 PM0 commentsViews:

bhaji_marketमुंबई – 20 जानेवारी : महाराष्ट्रात भाजी उत्पादनावर परिणाम झाला असला तरी मुंबईत परराज्यातून भाजी मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाज्यांचे भाव मागील आठवड्या पेक्षा निम्म्याहून खाली उतरले आहे.

गुजरातवरून गेल्या दोन दिवसांत भाज्या येत आहेत. यात वांगी, मटार , फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, मिरची, भेंडी, गाजर, शेवगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झालीय. घाऊक मार्केटमध्ये मटार जो मागील आठवड्यात 30 ते 35 रुपये किलो होता तोच मटार  18 रुपये किलोवर आलाय.

फ्लावर 10 रुपये किलो झालाय तर कोबी 6 रुपये किलो झालाय. गेल्या तीन दिवसांत मुंबई मार्केटमध्ये रोज भाजीपाल्याच्या 700 गाड्यांची आवक झाली आहे. नेहमी 500 ते 550 गाड्यांची आवक होत असते या तुलनेत गेल्या तीन दिवसात आवक वाढली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close