डाळिंबाची बागच सलाईनवर !

January 20, 2016 11:13 PM0 commentsViews:

बारामती – 20 जानेवारी : इंदापूर तालुक्यातील डाळींब बागा चक्क सलाईनवर जगत आहेत. सलाईनच्या बाटल्यांमध्ये पाणी टाकून हे या झाडांना पुरवलं जातंय.7454salain3

इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी गावातील डाळिंबाच्या बागा पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. या बागा वाचवण्यासाठी गणपत खारतोडे या शेतकऱ्याने डाळिंबाच्या झाडाला सलाईनच्या बाटल्या लावून त्यात पाणी ओतून झाडे जगवण्याचा प्रयत्न चालवलाय.
खडकवासला प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी येतं. मात्र, मागील सहा महिन्यापासून या परिसरात कालव्याला पाणीच आले नाही. त्यामुळे या परिसरातील विहिरी, बोअरवेलचे पाणीच गेलंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे शेतातील पिकं जगवण्यासाठी मोठी धडपड चाललीय. तर खडकवासला कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्याची मागणी वाढत आहे.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close