सरोगसीनं आई होणा-या महिलेलाही मिळणार 6 महिन्यांची रजा

January 21, 2016 8:17 AM0 commentsViews:

Surrogacy-1024_116320k

21 जानेवारी : राज्य सरकानं आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढं सरोगसी पद्धतीनं अपत्य प्राप्त झालेल्या महिलेलाही बाळाच्या संगोपनासाठी 6 महिन्यांची रजा मिळणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं जीआर काढला आहे.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांशिवाय, मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्थातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांना देखील हा निर्णय लागू होईल. आतापर्यंत फक्त नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होणाऱ्या महिलांना 180 दिवसांची, तर बाळ दत्तक घेतल्यास 90 दिवसांची रजा मिळत असे. या निर्णयामुळं पहिल्यांदाच सरोगसी पद्धतीने मातृत्व मिळालेल्या महिलेला सुट्टीची मुभा मिळणार आहे. मात्र, जर एखाद्या महिलेला मुलं असताना देखील ती दुस-या अपत्यासाठी सरोगसीचा मार्ग वापरणार असेल, तर तिला रजेची सवलत मिळणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close