हुंड्यासाठी पैसे नसल्याने तरूणीची आत्महत्या

January 21, 2016 12:45 PM0 commentsViews:

dowry21

21 जानेवारी : वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लातूर जिह्यातील तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी लिहीलेल्या पत्रात ‘अजून किती दिवस ही प्रथा चालणार आहे’, असा सवाल तिने केला आहे.

मोहिनी पांडुरंग भिसे (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. मोहिनीला बघायला येणारे प्रत्येक स्थळ हुंडय़ाची मागणी करायचे. मात्र, दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतात काहीच उगवले नाही. त्यामुळे लग्नासाठी आई-वडीलांकडे हुंडय़ासाठी पैसे नसल्याने मोहिनीने गळफास घेऊन आपला जीवन संपवला. मोहिनीला एक भाऊ व विवाहित बहीण आहे. गावातील शाळेतच मोहिनीचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले होते.

पत्रात मोहिनीने लिहीले की, पप्पा प्रत्येक गोष्टीला मुलीनेच का झुकावे? प्रत्येकजण हुंडा का मागतो? ही प्रथा लवकर बंद व्हावी. मी गेल्यानंतर माझ्यासाठी कोणतीही विधी करू नये, अथवा कोणीही रडु नये, यातच मला शांती आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close