‘भारतरत्न मिळाले तर आनंदच…’

March 2, 2010 1:30 PM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारीमला भारतरत्न मिळाले तर आनंदच होईल. हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे, अशा भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड रचणारा सचिन आज एक सामाजिक संस्था जॉय ऑफ गिव्हिंगच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. आपल्या प्रोफेशनल करिअरसोबतच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सचिनने आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेली अनेक वर्षे सचिन जॉय ऑफ गिव्हिंग या एनजीओसाठी काम करतो. गेल्या वर्षी त्याने लहान मुलांसाठी तब्बल 10 कोटींचा निधी उभारला होता. तर 200 मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला होता. यावेळी सचिनने भारतीय हॉकी टीमला शुभेच्छा दिल्या.

close