कांदिवलीत 12 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू

January 21, 2016 5:10 PM0 commentsViews:

kandivali boykandivali boyमुंबई – 21 जानेवारी :  कांदिवलीतील राज आर्केड या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन खाली पडून एका सातवीतल्या शिकणा-या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये.  ‘माझ्या आईला कपडे वाळायला घालायचे आहेत’ असं, कारण देत त्या मुलानं वॉचमनकडून टेरेसची चावी घेतली  होती. इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा मुलगा टेरेसवर गेल्याचं दिसतंय. मात्र हा अपघात आहे की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केलीय.

मुंबईच्या कांदिवली परिसरात राज आर्केड नावाच्या इमारतीच्या 12 व्या मजल्या वरुन एका 13 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. परंतु, त्याने आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सातवी इयत्तेत शिकणारा मुलगा आपल्या आई वडलांसोबत राहत होता. मुलगा क्लासवरुन परत आला त्यावेळी वॉचमॅनकडून आईला कपडे
वाळायला घालायचे आहे असं सांगून  टेरिसची चावी मागितली.

बिल्डिंगला लावलेल्या पायऱ्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा मुलगावर चढून जात आहे आणि देवाच्या पाया पडत असल्याचं दिसून आलंय. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यूची तक्रार नोंदवली असून पुढील तपास करीत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close