बहिणीची सोयरिक मोडली म्हणून भावाची आत्महत्या

January 21, 2016 5:23 PM0 commentsViews:

nanded_boy3नांदेड – 21 जानेवारी : लातूरमध्ये हुंड्या देऊ नये म्हणून एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये  हुंडयासाठी  पैसे नसल्याने बहिणीची सोयरिक मोडली आणि दुख सहन न झाल्याने भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हिमायत नगर तालुक्यातील डोलारी या गावात मंगळवारी ही घटना घडली. सतीश कदम असं मयत तरुणाचं नाव आहे.

मागच्या वर्षी त्याचा बहिणीची सोयरिक सिरपल्लीगोपीनाथ कदम या युवकाशी झाली होती. नविन वर्षात लग्न करण्याचं ठरलं होतं.
लग्नाची तारीख ठरवण्यासाठी सतीश त्याचे वडील माधव कदम आणि काही नातेवाईक सासरच्या मंडळीकडे नुकतेच गेले होते. मात्र, येथे सासरच्या मंडळींनी मुलींच्या वडलाकडे दोन लाखाच्या आगाऊ रक्कमेची मागणी केली. अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत झालेली नापिकीने हैराण असताना आगाउचा हुंडा कसा द्यायचा या विवंचनेत कुटुंब सापडले होते. त्यात बहिणीची सोयरिक मोडल्याचे दुख सहन न झालेल्या सतीश माधव कदम याने गावातीलच सार्वजिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणी 4 जणांविरुद्ध आत्महत्येस कारणीभुत ठरल्याचा गुन्हा हिमायतनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close