हैदराबाद विद्यापीठानं 4 विद्यार्थ्यांचं निलंबन घेतलं मागे

January 21, 2016 6:42 PM0 commentsViews:

haidrabad_university3हैदराबाद – 21 जानेवारी : रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. आज या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. हैदराबाद विद्यापीठानं अखेर चारही विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेतलंय.

रोहितसह चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांचं निलंबन आज मागे घेण्यात आलंय. विद्यापिठाच्या कार्यकारिणीनं बैठक घेऊन हा निर्णय घेतलाय. परिस्थिती गंभीर होत चाललीये म्हणूनच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. ज्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि देशभरात त्याच्या या आत्महत्येविरोधात निदर्शनं झाली आणि म्हणूनच सगळीकडून दबाव वाढल्यानं या मुलांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. काल बुधवारीच मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दलित विरुद्ध सवर्ण असा वाद नाही. रोहित आणि त्याच्या मित्राचं निलंबन हे विद्यापीठाच्या नियमांनुसारच करण्यात आलं होतं असा दावा इराणींनी केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close