बिग बींसोबत प्रियांकाही म्हणणार ‘अतिथी देवो भव:’

January 21, 2016 8:32 PM0 commentsViews:

amitabh_priyankaनवी दिल्ली – 21 जानेवारी : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता प्रियांका चोप्राही ‘अतिथी देवो भव:’ म्हणणार आहे. केंद्र सरकारने अखेर अतुल्य भारतचे ब्रँड ऍम्बेसेडरची नाव निश्चित केली असून बिग बी आणि प्रियांकाच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आणि अमिताभ बच्चन हे नवे ब्रँड ऍम्बेसेडर असणार आहे. या दोघांची नाव 26 जानेवारी नंतर अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल. आधीच अमिताभ बच्चन यांचं नाव जाहीर कऱण्यात आलं होतं. बिग बी आणि प्रियांकाची 3 वर्षांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अमिताभ आणि प्रियंाका यांनी यासाठी एकही पैसे घेणार नाहीत. या आधी अतुल्य भारतचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून आमीर खानने 10 वर्ष राहिला होता. ज्या कंपनीसोबत ‘अतुल्य भारत अभियानासाठी सरकारने करार केला होता. तो संपुष्टात आल्यामुळे आमिर खानचं ब्रँड ऍम्बेसेडरपद रद्द झालं. पण असहिष्णुतेच्या मुद्यावर जाहीर भाष्य केल्यामुळे आमिरला ब्रँड ऍम्बेसेडर सोडावं लागलं अशी चर्चा रंगली होती. आता बॉलिवूडचा शहेनशहा आणि प्रियांका चोप्रा ‘अतिथी देवो भव:’ चा संदेश देत लवकरच अतुल्य भारत अभियानाच्या जाहिरातीत दिसणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close