‘हम भी किसी से कम नहीं’, हिंगोलीत भरली महिला कुस्ती स्पर्धा

January 21, 2016 10:19 PM0 commentsViews:

हिंगोली – 21 जानेवारी : कुस्ती म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र पण हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं खास महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगाव इथं दरवर्षी यात्रा भरते. कावरखे दुर्गा महोत्सव समितीच्या वतीनं याहीवर्षी इथं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय.hinglo_mahila_kusti

वेगवेगळ्या विभागातून यासाठी मोठमोठे मल्ल स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षीचं विशेष म्हणजे महिलांची कुस्ती स्पर्धा…या स्पर्धेत 14 महिला मल्लांनी सहभाग नोंदवला. महिलांची कुस्ती स्पर्धा अतिशय अटीतटीची झाली होती. महिला मल्लांनी कुस्तीद्वारे स्वतःची क्षमता सिद्ध केली. अशा प्रकारे जर महिलांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तर ग्रामीण भागातील मुलींमध्ये कुस्तीविषयी आकर्षण निर्माण होईल आणि त्यांच्यातले सुप्त गुण बाहेर येतील असा विश्वास महिला मल्लांनी व्यक्त केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close