वतन जमीन बिल्डरांना दिल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

March 2, 2010 2:12 PM0 commentsViews: 7

2 फेब्रुवारीपुण्यातील रामोशी वतनाची 102 एकर जमीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप झाला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवी बराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. चव्हाण विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील भांबुर्डा-शिवाजीनगर येथली रामोशी वतनाची ही जमीन त्यांचे निकटवर्तीय बांधकाम व्यावसायिक जयंत शहा आणि इतर व्यावसायिकांच्या नावे करून दिली. यामध्ये मशीद, मंदिर, वैदूवाडी आणि पानशेत धरणग्रस्तांची वसाहत तसेच रामोशींच्या झोपडपट्टीचा समावेश असल्याचा आरोप बराटे यांनी केला आहे. असा आरोप बराटे यांनी केलाय. 'राजकीय हेतूने आरोप'दरम्यान, याप्रकरणी राजकीय हेतूने माझ्यावर आरोप केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. जयंत शाह नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ही जमीन दिलेली नाही. फक्त 15 ते 16 एकर जमिनीचा प्रश्न आहे. 102 एकर जमिनीचा संबंधच नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आरोपकर्त्याला कोर्टात जाऊन आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

close