सामुहिक कॉपी विरोधात कारवाई

March 2, 2010 2:20 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारी सोलापुरातील सामुहिक कॉपी प्रकरणी 20 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. 12वीच्या परीक्षेत सर्रासपणे चाललेला हा कॉपीचा प्रकार 'आयबीएन-लोकमत'ने उघडकीस आणला होता.यानंतर प्रशासनाने या प्रकाराविरोधात कडक कारवाई केली. अटक केलेल्या शिक्षकांमध्ये संस्थाचालकाच्या भावाचाही समावेश आहे. सोलापुरातील हत्तुरे नगरातील मल्लिकार्जुन शाळेत पेपर सोडवताना शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

close