सांगलीत अमेरिकन लावणी

March 2, 2010 2:29 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीसांगलीतील शांतीनिकेतन लोक महाविद्यालयात काल एक अफलातून ठसकेदार लावणी सादर झाली. या लावणीला सांगलीकरांनी जोरदार दाद दिली. पण ही लावणी जरा हटके होती. कारण ती सादर केली होती अमेरिकन विद्याथिर्नींनी.महराष्ट्राचे लोकजीवन आणि स्त्री जीवनाचा पुणे विद्यापीठात अभ्यास करणार्‍या या विद्यार्थिनींनी कॉलेजातील गॅदिरिंगमध्ये ही आत्मसात केलेली ही कला सादर केली. कॅथरिन, मेडिन आणि ज्युलिया या तिघींनी केवळ 3 तासात लावणी शिकून ती सादर केली. सांगलीकरांनीही 'वन्स मोअर' देऊन त्यांना दाद दिली. या मुलींनी एवढ्या लवकर ही नृत्यकला आत्मसात केल्याबद्दल नृत्य दिग्दर्शक महेश पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

close